Mumbai Rain | मुंबईत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी, नोकरदारांची तारांबळ | Sakal

2022-04-21 197

राज्यात तापमानाचा पारा चढलेला असतानाही हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार आज सकाळी ९.४५च्या सुमारास मुंबई पूर्व उपनगरात पाऊस (Mumbai rain) पडला. यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. पावसात भिजू नये यासाठी आपल्या दुचाकी झाडाखाली आणि ब्रिजखाली लावताना दिसले. तसेच पायी चालणाऱ्यांनी मिळेल तिथे आसरा घेतला.
मुंबईसह कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडला. दरम्यान हवामान खात्याच्या मुंबई विभागाने (IMD) पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्‍ये पुढील ३-४ तासांमध्‍ये विजांच्या कडकडाटासह वादळ वाहण्याचा इशारा दिला होता. तसेच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यताही वर्तवली आहे. यावेळी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्यातं आवाहनही हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिली आहे.
Rain Alert by IMD Mumbai

#MumbaiRain #MumbaiWeather #MumbaiNews #Sakal #IMD #WeatherForecast #Rain #अवकाळी_पाऊस

Videos similaires